शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त योगासने Best Yoga Poses for Children Going School

आपल्या गावांत उत्तम योग प्रशिक्षक कोण आहे माहिती आहे का? नाही? आपल्या आसपासच्या मुलांना पाहा . तुम्हाला आश्चर्य वाटेल की जी योगासने करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात ती आसने मुले अगदी लीलया करताना दिसतात. शिशु असेल की दुसरीत शिकणारे बाळ, सतत योग करत असतात. मोठे होतील तसे योग करायचे बंद होऊ लागते. मग पुन्हा योग शिकण्याची गरज पडते. जगभरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी आता मान्य केले आहे की मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये योगाची महत्वपूर्ण भूमिका आहे. ते आत्ताच्या  मुलांना या प्राचीन प्रथेबाबत आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

शालेय विद्यार्थ्यांसाठी लाभदायक योगासने

शालेय विद्यार्थ्यांना लाभदायक अशा काही योगासनांची यादी :

Pranamasana

प्रणाम आसन

हे आसन सर्वाना माहित आहे. आपण हे आसन घरी कोणी पाहुणे आले तर, मोठ्यांचे स्वागत करताना तसेच शाळेत प्रार्थनेच्या वेळी दररोज करतो. हे आसन तंत्रिका तंत्राला विश्रांती देतात तसेच शरीराला संतुलन देते. हे सूर्य नमस्कारातील पहिले आसन आहे.

हस्तोत्तानासन

जरी हे साधे ताण देणारे आसन वाटत असले तरी याचे अनेक लाभ आहेत. या आसनामुळे खांदे मजबूत होण्यास मदत होते. रक्तातील ऑक्सिजनचा स्तर चांगला राहतो. मान आणि पाठीच्या स्नायुंना आराम देते. हे आसन पाठीच्या कण्यासाठी उपयुक्त आहे कारण त्यात तणाव निर्माण होतो. पोटातील स्नायूंमध्ये तणाव निर्माण होत असल्याने उपयुक्त आहे. थॉयराइड ग्रंठीन्साठी लाभदायक आहे. हे सूर्य नमस्कारातील दुसरे आणि अकरावे आसन आहे.

HastaPadasana

डोक्यातील रक्त संचारामध्ये सुधारासाठी हे उपयुक्त आसन आहे. पचन, तंत्रिका आणि अंतःस्त्राव ग्रंथी प्रणालीला उद्युक्त करते. या आसनामुळे पाठीचा कणा, पाठीचे स्नायू आणि पायांच्या मागील स्नायुमध्ये तणाव निर्माण होतो. हे सूर्य नमस्कारातील तिसरे आणि दहावे आसन आहे.

Ashwa Sanchalanasana

अश्व  संचालनासन

या आसनाचा लाभ कंबर आणि पायांना लवचिक बनवण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी होतो. हे सूर्य नमस्कारातील चौथे आणि नववे आसन आहे.

दंडासन

या आसनामध्ये शरीराचे पूर्ण वजन मनगटांवर येत असल्याने ते पूर्णपणे मजबूत बनतात. तसेच हात आणि पाठीच्या कण्याला आणि पोटातील स्नायूंना मजबूत बनवतात. हे सूर्य नमस्कारातील पांचवे आसन आहे.

अष्टांग नमस्कार

यामध्ये आठ अंगाद्वारे नमस्कार केला जातो. हे आसन एकाच वेळी आठ अंगांवर काम करते. पाठीचे स्नायू मजबूत बनतात आणि कणा लवचिक बनतो. आपले मानसिक ताणतणाव आणि चिंता कमी करते. हे सूर्य नमस्कारातील सहावे आसन आहे.

Bhujangasan

भुजंगासन खांदे आणि मानेला खुले करते. पोटाचे स्नायू मजबूत बनतात. पाठ आणि खांदे मजबूत बनतात. पाठीच्या वरच्या आणि मधील भागामध्ये रक्त संचार सुधारून त्यांना लवचिक बनवते आणि तेथील तणाव आणि थकवा कमी करते. हे सूर्य नमस्कारातील सातवे आसन आहे.

पर्वतासन

या आसनामुळे पायाच्या मागीक स्नायुमध्ये, गुडघ्याच्या मागील नसांमध्ये आणि पाठीतील स्नायुमध्ये ताण निर्माण होतो. थकवा नाहीसा होतो. स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. हे सूर्य नमस्कारातील आठवे आसन आहे.

Tadasana

ताड़ासन

ताडासानामुळे जागरुकता, रक्त संचार आणि पचन सुधारते. यामुळे ऊर्जा आणि उत्साह वाढतो. हे सूर्य नमस्कारातील बारावे आणि शेवटचे आसन आहे.

Dhanurasana

हे आसन पाठ आणि पोटातील स्नायुंना मजबूत बनवते. पाठ लवचिक बनते. तणाव आणि थकव्यापासून मुक्ती मिळते.

Vrikshasana in Hindi

वृक्षासनामुळे मन संतुलित बनते, एकाग्रता वाढते आणि पाठ, हात, कंबर आणि पायांना मजबूत बनवते.

Marjariasana

या आसनामुळे मन शांत बनते. रक्त संचार आणि पचन सुधारते. मनगटे आणि खांदे मजबूत बनतात.

Vajrasana - Kneeling Pose
१३

वज्रासन

अन्न पचवण्यासाठी आणि पायातील आणि मांड्यांच्या नसांना मजबूत बनवण्यासाठी वज्रासन एक उत्कृष्ट आसन आहे.

या आसनामुळे उत्सुकता वाढते, शरीरातील संतुलन, साहस वाढवते. शांती प्राप्त होते. हात, पाय आणि पाठीच्या खालील भागास मजबूत बनवते.

Balasana

शिशुआसन पाठीला आराम देणारे आणि स्नायू गटाला शांत करणारे आसन आहे.

ही योगासने खास करून शाळेत / महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सहाय्य करणारी आसने आहेत. यातील आसने विविध स्नायू गटांना बळकटी देणारे आणि सर्व प्रकारचे तणाव आणि थकवा दूर करून संतुलित मन आणि शरीर प्राप्त करून देतात.योगा केवळ व्यायाम प्रकार नाही तर ती आपली प्रकृती आहे. आणि जी आपली प्रकृती असते ती नेहमी आपल्या प्रगतीसाठी सहाय्यक असते.